IPL Tickets : आयपीएल सामन्याची तिकीटे चढ्या दराने विकणाऱ्यास एकाला अटक

एमपीसी न्यूज – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंटस या आयपीएल क्रिकेट सामन्याची तिकिटे (IPL Tickets) चढ्या दराने विक्री केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी एकाला अटक केली आहे.  शनिवारी (दि. 7) रात्री हा सामना झाला. त्यावेळी दोघे जण तिकीट ब्लॅकने विकतानाचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

बाबासाहेब रामदास आमले (वय 26, रा. कुसगाव, ता. मावळ) याला अटक केली असून त्याच्यासह शुभम (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रेयस हनुमंत येलवार (वय 21, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri News : विविध मागण्यांसाठी फेरीवाल्यांचे महापालिकेसमोर आंदोलन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी येलवार त्यांचे मित्र सुनील गायकवाड, हर्षल विश्वे, आर्यन गायकवाड असे गहुंजे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंटस हा आयपीएल क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेले होते.

Dating App Crime : बंबल डेटिंग अॅपवरील मित्राने मालदीवच्या ट्रिपची ऑफर देत केला विनयभंग

स्टेडियमच्या गेटच्या आतमध्ये वेस्ट स्टँड जवळ गेट नंबर तीनला दोघेजण उभे होते. ते दोघे बेकायदेशीरपणे आयपीएल मॅचची तिकीट विक्री करीत होते. त्यांनी फिर्यादीकडून जास्त पैसे उकलण्याचा इराद्याने तिकिटांची (IPL Tickets) विक्री केली. याची तक्रार फिर्यादी यांनी थेट पोलिसात केली. पोलिसांनी बाबासाहेब याला अटक केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.