Movement of peddlers : विविध मागण्यांसाठी फेरीवाल्यांचे महापालिकेसमोर आंदोलन

एमपीसी न्यूज – नॅशनल हॉकर फेडरेशन , कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कायद्याची (Movement of peddlers) अंमलबजावणी करावी, सध्या सुरू असलेली आठ ही प्रभागातील कारवाई थांबवण्यात यावी व कायदेशीरपणे सर्वेक्षण व हॉकर्स झोनची निर्मिती करावी या मागण्यांसाठी महापालिका समोर आज (सोमवारी) पथारी, हातगाडी, टपरीधारकांचे कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रदेश संघटक अनिल बारवकर, कार्याध्यक्ष राजू बिराजदार,मधुकर वाघ, किरण साडेकर, समाधान जावळे ,कमल लष्करे, शोभा दोरवे, बिलाल तांबोळी, ओम प्रकाश मोरया, राजेश माने, संभाजी वाघमारे, सय्यद अली ,बालाजी लोखंडे, यासिन शेख, राजाभाऊ हाके, वसंत भोसले ,राजू बोराडे, नितीन सुरवसे, राजू खंडागळे , विजय लोखंडे, महादेव कोरे, पोपट करे, आदी सह पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी निगडी दापोडी डांगे चौक सांगवी पिंपळे गुरव भोसरी चिखली मोरेवस्ती थरमॅक्स चौक निगडी भक्ती शक्ती चौक अशा विविध परिसरातील विक्रेते उपस्थित होते.

 नको अर्बन स्ट्रीट ! आम्हाला हवे व्यवसायाचे स्ट्रीट ! बेकायदेशीर कारवाई चा धिक्कार असो ! व्यवसाय आमच्या हक्काचा !
आयुक्त भाऊ आम्ही काय खाऊ ? अशा घोषणा देत फेरीवाल्यांनी (Movement of peddlers) आपल्या मागण्यांचे प्रदर्शन केले.
अनिल बारवकर म्हणाले की पथारी, हातगाडी धारक स्वतःचा रोजगार निर्माण करतो या रोजगाराला पूरक वातावरण तयार करून देणे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे आम्ही आमच्या जीवनाची लढाई लढत असताना आम्हाला समर्थन देणे सोडून कारवाई मोठ्या प्रमाणात करून कायद्याचा भंग केला जात आहे.

नखाते म्हणाले की, स्मार्ट सिटीचा बोजवारा उडाला आहे. त्याच नावाने शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असून या कारवाईने प्रश्न सुटणार नाही तर फेरीवाल्यांचे योग्य नियोजन सर्वेक्षण व हॉकर्स झोन अंमलबजावणीतून प्रश्न सुटणार आहे अशी भूमिका आयुक्तांनी घेणे गरजेचे आहे. अन्यथा आधीच महागाई , त्यात बेरोजगारी वाढलेली आहे त्यातच स्वयंरोजगार हिरावल्यास शहरांमध्ये उपासमारीने हाहाकार होऊ शकतो आयुक्तांनी पुरस्काराकडे लक्ष देण्यापेक्षा गोरगरीब विक्रेत्याकडे लक्ष द्यावे.

जेणेकरून स्वयंरोजगार निर्माण होईल . स्वच्छ भारत अभियान मध्ये फेरीवाल्यांनी मोठे योगदान दिले स्वच्छ आणि टापटीप व्यवसायाचे (Movement of peddlers) सादरीकरण केले यामुळे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेला मिळालेल्या पुरस्कारांमध्ये फेरीवाल्यांचे सुद्धा योगदान आहे. कारवाई न थांबल्यास बेमुदत अंदोलन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.