Ajit Pawar : संजय राऊत यांना ‘तो’ अधिकार आहे का? – अजित पवार यांचा सवाल

एमपीसी न्यूज – शिरुर लोकसभा मतदारसंघाचा पुढील म्हणजेच 2024 च्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा खासदार होणार यावरुन राज्यातील सत्तेत एकत्रित असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये जुंपली आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी शिरूरमधून पुढच्यावेळी शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील खासदार होतील असे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी केले होते. त्याला उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांना तिकीट देण्याचा अधिकार आहे की उद्धव ठाकरे यांना आहे?”असा सवालच अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपस्थित केला.

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे लोकसभेत प्रतिनीधीत्व करतात. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे तीन टर्म खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा 58 हजार 278 मतांनी पराभव केला होता. शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या डॉ. कोल्हे यांच्याकडून झालेला आढळराव यांचा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसून येते.

Navneet Rana Bail : जामीन का द्यावा? सत्र न्यायालयाने मागितले राणा दाम्पत्यांकडे उत्तर

काय म्हणाले होते संजय राऊत?

राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार (Ajit Pawar) सत्तेत आहे. असे असताना दोन दिवसांपूर्वी पुणे दौ-यावर असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचा खासदार असलेल्या शिरूरमधून पुढच्यावेळी शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील खासदार होतील असे वक्तव्य केले.

त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे (Ajit Pawar) नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना बरे वाटण्यासाठी ते वक्तव्य केले असावे. उद्या मी पण जिथे शिवसेनेचा खासदार आहे तिथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बरे वाटावे म्हणून उमेदवार जाहीर करील. पण, उमेदवार जाहीर केल्यावर मला तिकीट देण्याचा अधिकार आहे की शरद पवारांना आहे? संजय राऊत यांना तिकीट देण्याचा अधिकार आहे की उद्धव ठाकरे यांना आहे? असा सवाल केला.

https://www.youtube.com/watch?v=f8ubcrX8cqw

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.