ISRO XPoSat : ‘एक्सपोसॅट’ उपग्रह अपेक्षित कक्षेत यशस्वीरित्या स्थापित…इस्रोची यशस्वी मोहीमेने नववर्षाची सुरुवात

एमपीसी न्यूज – इस्रोकडून आज  1 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी ‘एक्सपोसॅट’ या ( ISRO XPoSat) उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले असून हा उपग्रह अपेक्षित कक्षेत यशस्वीरित्या स्थापित झाला आहे.  ‘एक्सपोसॅट’ उपग्रह श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केला गेला.

UPI : आज 1 जानेवारीपासून यूपीआयचे नियम बदलणार, जाणून घेऊयात नवीन नियम

हा उपग्रह अवकाशात होणाऱ्या किरणोत्सर्गाचा अभ्यास करेल. त्यांच्या स्रोतांचे फोटो घेतील. त्यात बसवलेली दुर्बीण रमण संशोधन संस्थेनं बनवली आहे. हा उपग्रह विश्वातील 50 तेजस्वी स्रोतांचा अभ्यास करणार आहे.हा उपग्रह 650 किमी उंचीवर पाठवण्यात आला आहे.

2017 मध्ये इस्रोनं हे अभियान सुरू केलं होतं. या मोहिमेचा खर्च 9.50 कोटी रुपये आहे. प्रक्षेपणानंतर सुमारे 22 मिनिटं, एक्सपोसॅट उपग्रह त्याच्या नियुक्त कक्षेत तैनात केला जाईल. या उपग्रहामध्ये दोन पेलोड्स आहेत. पहिला – पोलिक्स (POLIX) आणि दुसरा – एक्सपेक्ट .

अशा प्रकारची ही भारताची पहिली आणि जगातील दुसरीच मोहीम ( ISRO XPoSat)  आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.