Pune : लष्कर परिसरात हॉटेलला आग

एमपीसी न्यूज – लष्कर परिसरात सरबतवाला चौकातील एका हॉटेलमध्ये ( Pune ) आग लागल्याची घटना रविवारी (दि.31) घडली. भटार खान्यातील कामगार बाहेर पडल्यामुळे अनर्थ टळला. या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

ISRO XPoSat : ‘एक्सपोसॅट’ उपग्रह अपेक्षित कक्षेत यशस्वीरित्या स्थापित…इस्रोची यशस्वी मोहीमेने नववर्षाची सुरुवात

साहिल हॉटेलच्या भटारखान्यात गॅस गळतीमुळे दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत गायकर, रोहित रणपिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी आग आटोक्यात आणली. त्यांनी भटारखान्यातून चार सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. एका सिलेंडरमधून गॅसगळती झाल्याने आग लागल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात ( Pune ) आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.