Rajesh Patil : सांस्कृतिक संचित जपणे हे आपले नैतिक कर्तव्य – राजेश पाटील

एमपीसी न्यूज- आपल्या अतिप्राचीन देशाचे सांस्कृतिक संचित जपणे, हे आपले नैतिक कर्तव्य आहे. असे विचार पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी चिंचवडगाव येथील क्रांतितीर्थ चापेकर वाडा येथे रविवार (दि.14) व्यक्त केले. हे प्रदर्शन 14 ते 16 ऑगस्ट या दोन दिवसाच्या कालावधीत आयोजीत केले आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत चापेकर वाड्यातील या विनाशुल्क खुले राहणार आहे.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीने ‘गाणारे दगड – बोलणारे पाषाण’ या अभिनव प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी  राजेश पाटील बोलत होते. बांधकाम व्यावसायिक अनिल फरांदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंत हरहरे, चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, उपाध्यक्षा डॉ. शकुंतला बन्सल, विश्वस्त मिलिंद देशपांडे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे, प्रभाकर कुंटे, चापेकर स्मारक समितीच्या सहकार्यवाह रविंद्र नामदे, कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, सदस्य गतिराम भोईर, अशोक पारखी, निता मोहिते, विलास लांडगे, अतुल आडे  उपस्थित होते.

प्रभाकर कुंटे यांनी ‘गाणारे दगड – बोलणारे पाषाण’ या अभिनव प्रदर्शनाची (Rajesh Patil) माहिती देताना सांगितले की, माझे आई-वडील म्हणजे विजया आणि कै. मोरेश्वर कुंटे यांनी आपल्या वैवाहिक जीवनाची पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यावर वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करताना दुचाकीवरून सव्वा लाख किलोमीटर प्रवास करून संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालून सुमारे अठरा हजार मंदिरांना भेटी दिल्या. त्यांच्या या कार्याची दखल ‘लिम्का बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने घेतली. या प्रवासात पाण्यावर तरंगणारे दगड, आघात केल्यावर संगीताचे सूर निर्माण करणारे पाषाण, अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा संग्रह त्यांनी केला. याशिवाय वास्तूशास्त्र, शिल्पकला यांचे अद्भुत दर्शन घडविणाऱ्या आणि अठरा हजार वर्षांचा इतिहास कथन करणाऱ्या अनेक बाबी त्यांनी छायाचित्रांच्या माध्यमातून प्रदर्शित केल्या आहेत.

अखंड भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांनी प्रारंभी उपनिषदामधील श्लोकांचे पठण, मध्यंतरात पोवाडागायन आणि समारोप प्रसंगी कबीराच्या दोह्यांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. शकुंतला बन्सल यांनी आभार मानले.

Independence Day : आयआयएमएसच्या वतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.