Jadhavwadi : थोरांदळे बोअरवेल दुर्घटनेप्रकरणी बोअरवेल मालकाच्या विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज- आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील बोअरवेल दुर्घटनेप्रकरणी जागा व बोअरवेल मालक अविनाश नामदेव जाधव यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यापुढे अवैध बोअरवेल खोदणाऱ्यांवरही कडक कारवाई करणार असल्याचे तहसीलदार सुषमा पाईकर यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्यातील जाधववाडीजवळील थोरांदळे येथे 200 फूट बोअरवेलमध्ये सहा वर्षाचा रवी पंडित भिल हा मुलगा पडल्याची घटना बुधवारी (दि.20)दुपारी घडली. एनडीआरएफच्या टीमने दहा तास अथक परिश्रम करून गुरुवारी (दि 21 ) सकाळी या मुलाला सुखरुपणे बाहेर काढले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.