Jayant Patil : प्रकाश सोळंखे यांच्याबद्दल अजित पवार यांना जिव्हाळा असता तर त्यांना मंत्री केले असते..

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ( Jayant Patil) बैठकीनंतर नेते जयंत पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी ही बैठक नियोजित असल्याचे सांगितले. तसेच त्यांना कार्यकर्त्यांना भेटण्याची इच्छा होती. असेही त्यांनी सांगितले. यासोबतच त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. शरद पवार यांनी पत्रकार परिषद बोलवण्याचे कारण विचारल्यावर त्यांना त्याचे कारण माहिती नसल्याचे स्पष्ट केले.   

अजित पवार यांनी केलेल्या विधानावर जयंत पाटील म्हणाले, की बऱ्याच गोष्टींची कामात केलेल्या कृत्यानंतर स्पष्टीकरण देण्याची प्रत्येकाची पद्धत असते. त्यामुळे त्यांनी जे काम केले, कृती केली त्यासाठी अस स्पष्टीकरण देतात ते मध्ये मध्ये…आम्ही ऐकतो ते… फक्त. काय सांगायचं ते मी योग्य वेळी सांगेन.

प्रकाश सोळंखे यांच्याबद्दल जिव्हाळा असता तर.. 

प्रकाश सोळंखे बद्दल जयंत पाटील म्हणाले, की त्यांना मंत्रीच व्हायचं होत. मला मंत्री का केलं नाही? म्हणून ते चिडून आले. ते राजीनामा देत होते पण मी त्यांना बोलावलं.. अजित पवारांनी माझ्यासमोरच सोळंखीना सांगितले की तुम्हाला पक्षाचा कार्याध्यक्ष पद देतो…पणं नंतर मला कधी पक्षाने तसे सांगितल नाही… मला सांगितलं असतं तर मी राजीनामा दिलाच असता.

पण सोळुंखे यांची नाराजी दूर करण्याची संधी अजित पवार यांना आली होती. आता नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली; त्यावेळेस बीड जिल्ह्यातून प्रकाश सोळंखे यांच्याबद्दल अजित पवार यांना जिव्हाळा असता तर त्यांनी प्रकाश याना मंत्री केलं असते.  प्रकाश सोळुंखे आमच्याकडे आले तर आम्ही त्यांचं गणित बसवूच, मला माहित नाही ते येतील का नाही.

बारामतीच्या जागेबद्दल सांगायचे तर त्यांचा पक्ष वेगळा झालेला आहे. त्यांना काही जागा लढवाव्या लागतील. काही ( Jayant Patil) मतदारसंघात लढवतील ते. पण ते खरंच लढवणार की लढवल्यासारखं दाखवणार हे बघायच आहे.

Bhosari : ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लॉथॉन’ टीमचा विश्वविक्रम; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

आंदोलन करा असा कोणी आदेश दिला नव्हता –

शरद पवार यांनी राजीनामा देणे, नंतर आंदोलन करणे हे ठरलेले असल्याचे विधान अजित पवार यांनी केले याबद्दल जयंत पाटील यांनी त्याच्याविषयी मला काही माहिती नाही. आंदोलन, राजीनामा असं काही ठरलेलं नव्हतं. आंदोलन करा असं कोणी कोणाला आदेश दिले नव्हते असे स्पष्ट केले.

तशी कोण मुख्यमंत्री होणार याची बरीच यादी मोठी आहे-

अजित पवार मुख्यमंत्री होणार असे संजय राऊत यांनी भाकीत केले आहे. यावर जयंत पाटील म्हणाले, की मला माहित नाही. एकनाथ शिंदे यांना रात्रीची व्यवस्थित झोप लागू दे. तुम्ही नका त्यांना त्रास देऊ. ते बिचारे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. प्रशासन देखील त्यांचं ऐकत नाही. परिस्थिती अशी की हे कधी जाणार म्हणून IAS अधिकारी IPS ऐकायच्या मनस्थितीत नाही. सगळं सरकारच ठप्प होत. त्यामुळे एकनाथ शिंदे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्यांच्याविषयी अशा वावड्या उठवणे योग्य नाही. तशी कोण मुख्यमंत्री होणार याची बरीच यादी मोठी आहे.

उरलेल्या जागांचीही घोषणा अजित पवार करतील. भाजपने बरीच माघार घेतलेली दिसत आहे. एका वृत्तपत्रात पहिल्या पानावर बातमी होती 26 भाजप, 11 शिंदे, 11 अजित पवार. त्यावर अनेक खुलासे आले. Times of india वर लोकांचा विश्वास आहे. ते अशी खोटी बातमी तर देणार नाही असे मला वाटते. लोकसभे विषयी महविकास आघाडीचे  आमचं गणित अजून ठरलं नाही. थोड्या दिवसानंतर चर्चा होईल. असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.