JuniSangvi : ‘दहीहंडी’साठी बाजारात रंगबेरंगी मटकी उपलब्ध

एमपीसी न्यूज – श्रावण पौर्णिमा आटोपताच सगळ्यांना वेध लागतात ते गोपाळकाला अर्थात दहीहंडी उत्सवाचे. तरुणांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन येणारा दहीहंडीचा सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे.

दहीहंडीसाठी लागणारी मटकी तयार करण्याची शहरातील कुंभार बांधवांची सध्या लगबग सुरु आहे. जुन्या सांगवीतील कुसुम कुंभार यांनी मटकींवर आकर्षक रंगरंगोटी करत आहेत. बाजारात मटकीची किंमती 50 रुपयांपासून सुरू होत आहेत. तर, रंगीत घागरी 150 रुपयांपर्यंत आहेत, असे विक्रेते सांगत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.