Kalewadi : शस्त्राच्या धाकाने टोळक्याने एकास लुटले; एकाला अटक

एमपीसी न्यूज – कारमधून आलेल्या सात जणांनी मिळून एका(Kalewadi )व्यक्तीला लुटले. तसेच परिसरात दहशत पसरवली. ही घटना शुक्रवारी (दि. 2) रात्री काळेवाडी येथील डी मार्ट पार्किंग मध्ये घडली.

शुभम अशोक तापकीर (वय 23, रा. काळेवाडी) याला पोलिसांनी (Kalewadi )अटक केली आहे. त्याच्यासह अन्य सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेंद्र प्रकाश सावंत (वय 37, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : ‘इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हल’ चा समारोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सावंत हे काळेवाडी येथील डी मार्ट पार्किंग मध्ये थांबले होते. त्यावेळी एका कार (एमएच 14/केजे 1588) मधून सातजण आले. त्यांनी कोयते आणि दगड मारून पार्किंग मधील वाहनांच्या काचा फोडल्या. त्यानंतर सावंत यांना कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्या खिशातून 1400 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. दरम्यान, पार्किंग मध्ये लोकांची गर्दी जमा झाली. आरोपींनी लोकांमध्ये दहशत निर्माण केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.