Karjat Crime: कर्जत हल्ला प्रकरणात सहा आरोपी अटक, गुन्ह्यात वापरलेले चार चाकी वाहन जप्त

एमपीसी न्यूज: कर्जत मध्ये सनी पवार या युवकास काही मुलांच्या टोळक्याने जबर मारहाण केली होती. या टोळक्यातील 6 जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. (Karjat Crime) त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेली गाडी जप्त करण्यात आली आहे.

 

सोहेल शौकत पठाण, अरबाज कासम पठाण दोघे रा. लोहार गल्ली, कर्जत, जुनेद जावेद पठाण आणि एक अल्पवयीन दोघे राहणार लोहार गल्ली कर्जत तालुका कर्जत, हुसेन कासम शेख, पिंपळे गुरव अरुण कंस्ट्रक्शन च्या पाठीमागे पिंपरी चिंचवड, अरबाज अजित शेख, राहणार पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे. (Karjat Crime) ह्या 6 आरोपींना अटक करण्यात आले आहे. प्रथम त्यामधील दोन आरोपी सोहेल शौकत पठाण, अरबाज कासम पठाण दोघे रा. लोहार गल्ली, कर्जत पोलिसांनी अटक केली. सदर आरोपींना उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय श्रीगोंदा न्यायालयासमोर हजर केले असता त्या आरोपींना 10 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Dehu Garbage: कचरा टाकणाऱ्या टेम्पो ड्रायव्हरला स्थानिक नागरिकांनी दिली समज

 

तसेच आरोपी जुनेद जावेद पठाण आणि एक अल्पवयीन (असलेबाबत सांगत आहे) दोघे राहणार लोहार गल्ली कर्जत तालुका कर्जत यांना पिंपरी चिंचवड या ठिकाणाहून ताब्यात घेतले असून त्यांना मदत करणारे हुसेन कासम शेख, रा. पिंपळे गुरव, अरबाज अजित शेख, राहणार पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या आरोपींना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक  गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, पोलीस हवालदार सुनील चव्हाण, बबन मखरे, दत्ता हिंगडे, सागर ससाने, जालिंदर माने, बबन बेरड यांनी चिंचवड पुणे येथून मोठ्या शिताफीने मध्यरात्री ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर या आरोपींना कर्जत येथे हजर केल्यानंतर त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हा करून पळून जाण्यासाठी वापरलेली ईरटीगा गाडी MH 16 AT 4278 ही सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे. आरोपींच्या शोधकार्यासाठी वेगवेगळ्या टीम तयार केलेल्या असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

 

 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, (Karjat Crime) पोलीस हवालदार सुनील चव्हाण, बबन मखरे, दत्ता हिंगडे, सागर ससाने, जालिंदर माने, बबन बेरड, कर्जत चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक सतीश गावित, अमरजित मोरे, अनंत सालगुडे, भगवान शिरसाठ पोलीस जवान संभाजी वाबळे, भाऊसाहेब काळे, शाहूराजे टिकते यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.