Katraj News : कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून चंदनाची झाडे चोरण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून चंदनाची झाडे तोडून चोरीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 ते 21 सप्टेंबर दरम्यान हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी सतिश हुलगे (वय 58, रा. बारामती, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाज चोरट्यांविरोधात भारतीय दंड विधान कलम 379, 511 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून चंदनाची झाडे तोडून चोरीचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.