Bhosari : चोरलेल्या गॅसचे चढ्या दराने विक्री; एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – घरगुती व्यापराच्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये (Bhosari)चोरून गॅस काढून त्याची चढ्या दराने विक्री करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 1) दुपारी दीड वाजताच्या सुमारास दिघी रोड भोसरी येथील माऊली गॅस सेल्स अँड सर्विसेस या दुकानात करण्यात आली.

गोविंद काशिनाथ रुंजे (वय 42, रा. चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या (Bhosari)व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुधीर डोळस यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद रूंजे याने बेकायदेशीरपणे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून चार किलो वजनाच्या लहान सिलेंडर मध्ये चोरून गॅस काढला. हा गॅस काढत असताना त्याने सुरक्षेची कोणतीही खबरदारी घेतली नाही. तसेच चोरलेल्या गॅसची चढ्या दराने विक्री केली.

Nigdi : मालपाणी कुटुंबाचा सदस्य असल्याचे सांगत महिलांना फसवणाऱ्या ठगास अटक

 

याबाबत माहिती मिळाली असता खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत दुकानातून 27 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.