Chikhali : चिखली येथील मजूर अड्ड्यावर मतदार जागृती

एमपीसी न्यूज – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपमार्फत मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. 36 शिरूर लोकसभा मतदारसंघा अंतर्गत 207 भोसरी विधानसभेच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क क्षेत्रीय कार्यालयाच्या पथका मार्फत मतदार (Chikhali) जनजागृती उपक्रम राबविण्यात येत असून  आज चिखली येथील मजूर अड्डा परिसरात मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यात आली.

Supreme court : ‘आप’ चे खासदार संजय सिंग यांना जामीन मंजूर

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकामार्फत  येत्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान (Chikhali) करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन कामगारांना करण्यात आले.तसेच उपस्थित शेकडो कामगारांनी मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ घेतली. पिंपरी- चिंचवड महागरपालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे व सहाय्यक आरोग्य अधिकारी तानाजी दाते यांचे मार्गदर्शनाखाली व 207 भोसरी मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रेवणनाथ लबडे यांच्या नेतृत्वात स्वीप उपक्रमाअंतर्गत  प्रथमच  मजूर अड्डा परिसरात मतदार जागृती करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व कामगार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.