Chinchwad News : विद्यार्थी जीवनापासून ध्येय बाळगल्यास यश निश्चित मिळते – अधिष्ठाता नरेंद्र देवरे

एमपीसी न्यूज : विद्यार्थी जीवनापासून ध्येय बाळगल्यास आयुष्यात यश निश्चित मिळते. यासाठी अभ्यासात चिकाटी व जिद्द असायला हवी, असे मत पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे अधिष्ठाता नरेंद्र देवरे यांनी व्यक्त केले.

खान्देश मराठा पाटील समाज संघाच्यावतीने 10 व 12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव चिंचवड येथील चैतन्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी 50 विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी आयुक्त राजेश पाटील लिखीत “ताई, मी कलेक्टर व्हयनू” हे पुस्तक देवून गौरव करण्यात आला. (Chinchwad News) टीसीएस कंपनीचे ग्लोबल हेड प्रवीण भामरे, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, सचिन चिंचवडे, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, माऊली सोनवणे आदी उपस्थित होते.

टीसीएस कंपनीचे ग्लोबल हेड प्रवीण भामरे म्हणाले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात कुठल्याही क्षेत्रात यश संपादन करायचे असेल तर अभ्यासासोबत कष्टाची जोड द्यायला हवी. तंत्रज्ञानामुळे जवळ आले असून त्याचा आवश्यक त्या ठिकाणी फायदा घ्यावा”.

Pimpri Corona Update : शहरात आज 44 नवीन रुग्णांची नोंद; 71 जणांना डिस्चार्ज

माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, “विद्यार्थी जीवनात अनेक प्रसंग येतात, त्याचा सामना करायला हवा. कठीण प्रसंगातून यश गाठलेल्या लेखकांची पुस्तके वाचनाची आवड निर्माण करून एखाद्या पुस्तकात जग आपली दखल घेईल. यावर लक्ष केंद्रीत करावे, असे त्यांनी सांगितले.(Chinchwad News) दरम्यान, गुणवंत विद्यार्थी व पालकांनी मनोगत व्यक्त करून मंडळाचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रम संयोजनासाठी उद्योजक शरद पाटील, पंकज निकम, मोतीलाल भामरे, ‍शिवाजी पाटील, शंकर पाटील यांच्यासह मंडळाचे सदस्य व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. सचिव शंकर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तर, सुप्रिया पाटील यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.