Talegaon-Dabhade : अन् विद्यार्थीच बनले शिक्षक

एमपीसी न्युज : तळेगाव दाभाडे येथील ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिरामध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जन्मदिन म्हणजेच शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.(Talegaon-Dabhade)दहावीचे विद्यार्थी स्वतः शिक्षक बनले आणि त्यांनी इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना चार तास शिकविले. एक दिवस शिक्षक बनल्याने विद्यार्थ्यांना आलेले अनुभव त्यांनी कथन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

ॲड.पु.वा. परांजपे विद्या मंदिरामध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे, ज्येष्ठ अध्यापक धनंजय नांगरे, शरद जांभळे यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत चारही भाषांमध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बद्दल माहिती सांगितली. तसेच शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक गीत सादर केले. इयत्ता दहावी अ. ब. क च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावली.(Talegaon-Dabhade)  त्यांनी चार तास वर्गांवर जाऊन अध्यापन केले. त्याबद्दलचे त्यांचे अनुभव प्रतिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या विद्यार्थी शिक्षकांनी अध्यापन केले त्याबद्दलचे अनुभव प्रतिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांनी सांगितले.

शिक्षक दिनाच्या दिवशी दहावी ब मधील आनंद देसाई या विद्यार्थ्याने मुख्याध्यापक पद भूषविले व दहावी अ मधील समीर शेख या विद्यार्थ्याने पर्यवेक्षकपद भूषविले. मुख्याध्यापक व पर्यवेक्षकाच्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी प्रयत्न केला व त्याबद्दलचे अनुभव त्यांनी सर्वांसमोर व्यक्त केले.(Talegaon-Dabhade)दहावी ब च्या वर्ग शिक्षिका वैशाली कोयते यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने *झुंज* या बोधकथेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतःशी झुंज दिली पाहिजे अशा प्रकारचे मार्गदर्शन केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी विद्यार्थी फक्त सुशिक्षित न होता एक सुजाण व जबाबदार नागरिक झाला पाहिजे. अशी इच्छा व्यक्त केली.

APMC Election : राज्यातील 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

दहावी ब च्या वर्गाकडून सर्व शिक्षकांना पेन व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दहावी ब मधील कुमारी प्राची स्वामी हिने केले तर आभार निकिता मुंढे हिने मानले.(Talegaon-Dabhade) कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावी ब मधील कुमारी प्रणाली कुंजीर हिने केले. कार्यक्रमाचे नियोजन वर्गशिक्षिका सौ. वैशाली कोयते, संगीता खराडे,वर्षा गुंड यांच्या मार्गदर्शनातून दहावी अ,ब,क च्या वर्गाने केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.