Pune Theft : गणेशोत्सवात गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक

एमपीसी न्यूज – पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी खूप दुरून (Pune Theft) नागरिक येतात. याच गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणाऱ्या टोळीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही कारवाई पुणे आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा एकच्या पथकाने केली आहे.

आगुराम्मा गिडीआण्णा गुंजा, आमुल्ला आप्पुतोलाप्रभाकर कंप्परिलाथिप्पा, अनिता पिटला सुधाकर, सुशिला इसाक तम्पीचेट्टी सर्व राहणार आंध्रप्रदेश यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना खबर मिळाली की, दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारी आंतरराज्यातील टोळी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी वेगवेगळ्या टीममध्ये विभागून कारवाई करत चौघांना रंगेहात पकडले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून 97 हजार रुपये किंमतीचे 4 मोबाईल जप्त केले. आरोपी विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा (Pune Theft) दाखल करण्यात आला आहे.

Talegaon-Dabhade : अन् विद्यार्थीच बनले शिक्षक

ही कारवाई गुन्हे शाखा एकचे पोलीस निरीक्षक संदिप भोसले, सहायक पोलीस निरीक्षक अशिष कवछेकर, सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार राहूल मखरे, शशिकांत दरेकर, दत्ता सोनावणे, अभिनव लडकत, शुभम देसाई, निलेश साबळे, अजय थोरात, महेश बामगुडे, अय्याज दड्डीकर, विठ्ठल साळुंखे, अनिकेत बाबर, तुषार माळवदकर, रुक्साना नदाफ यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.