Kamshet Station : मध्य रेल्वेतील दोन व्यवस्थापकांना ‘महाव्यवस्थापक सेफ्टी पुरस्कारा’ने सन्मानित

एमपीसी न्यूज : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (Kamshet Station) अनिल कुमार लाहोटी यांनी पुणे विभागातील कामशेत स्थानकातील शुभेंदू त्रिपाठी आणि ओम प्रकाश यांना ‘महाव्यवस्थापक सेफ्टी पुरस्कार’ देऊन सन्मानित केले आहे. आज मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आयोजित विशेष समारंभात त्यांनी ऑगस्ट महिन्यात कर्तव्य बजावताना केलेली दक्षता, अनुचित घटना रोखण्यात आणि रेल्वे वाहतुकीत सुरक्षितता सुनिश्चित करण्यात त्यांनी केलेले कौतुकास्पद योगदान यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय सेफ्टी कार्यासाठी प्रशस्तीपत्र आणि रुपये 2000 रोख रक्कम पारितोषिक आहे.

शुभेंदू त्रिपाठी व ओम प्रकाश यांना कामशेत स्थानकावरून (Kamshet Station) मालगाडी जात असताना सिग्नल अदलाबदलीच्या वेळी गाडीच्या पाठीमागील अकराव्या वॅगनमधून धूर निघत असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ स्थानक व्यवस्थापक तळेगाव यांना कळविले. तळेगाव येथे गाडी उभी करून तपासणी केली असता सदर वॅगनच्या चाकांमध्ये ब्रेक बाइंडिंग आढळून आले. याला ठीक करून मालगाडी रवाना करण्यात आली. त्यांच्याद्वारे तातडीने कारवाई केल्याने अनुचित प्रकार टाळता आला.

Pimpri Corona Update : शहरात आज 44 नवीन रुग्णांची नोंद; 71 जणांना डिस्चार्ज

शुभेंदू त्रिपाठी आणि ओमप्रकाश 2018 मध्ये रेल्वे सेवेत रुजू झाले आहेत तसेच ते तळेगाव येथे राहतात. यावेळी संबोधित करताना अनिल लाहोटी म्हणाले, की पुरस्कार विजेत्यांनी प्रशंसनीय काम केले असून रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणाने आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 24×7 दक्ष राहून केलेले काम इतरांना नेहमीच प्रेरणा देईल.

यावेळी अतिरिक्त महाव्यवस्थापक आलोक सिंह, मुख्य सेफ्टी अधिकारी पियुष कक्कड प्रधान मुख्य इंजिनिअर राजेश अरोरा, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक मुकुल जैन, प्रधान मुख्य यांत्रिक इंजिनियर ए के गुप्ता प्रधान मुख्य विद्युत इंजिनिअर एनपीसीह आणि इतर विभागांचे प्रमुख विभाग अध्यक्ष विभाग अध्यक्ष उपस्थित होते. तसेच मध्य रेल्वेच्या पाचही विभागांचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.