Khed : मोई येथे नदी पात्राजवळ एक लाख रुपयांची गावठी दारू जप्त

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील मोई येथे नदीपात्रा जवळ (Khed) पोलिसांनी छापा मारून 1 लाख 20 हजार रुपयांची दारु व त्याचे साहित्य जप्त केले आहे. हि कारवाई महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी (दि.12) केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी अमृत नरवतसिंग राठोड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस कॉन्स्टेबल अमोल पोपट माटे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Talegaon : किशोर आवारे हत्या प्रकरणातील आरोपींची आठ दिवस पोलीस कोठडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थली छापा मारला असता लोखंडी ड्रममध्ये 2 हजार लिटर गावठी दारू तयार (Khed) कऱण्याचे रसायन व इतर साहित्य असा एकूण 1लाख 20 हजार रुपायांचा आवज पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोली पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.