Khel Ratna Award : मिताली राज आणि आर अश्विन यांची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

एमपीसी न्यूज – भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार अव्वल क्रिकेटपटू मिताली राज आणि फिरकीपटू आर. अश्विन या दोघांची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शिफारस केली आहे. तसेच, के. एल. राहुल, शिखर धवन, जसप्रीत बुमराह यांची अर्जून पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

सारासार चर्चेनंतर मिताली राज आणि आर अश्विन यांची नावे खेलरत्न पुरस्कारासाठी निवडण्यात आली आहेत. तसेच, सलामीवीर शिखर धवन याची पुन्हा एकदा खेलरत्न साठी शिफारस करण्यात आली आहे. असे बीसीसीआयने ‘एएनआय’ या वृत्तवाहिनीला माहिती दिली आहे.

मागील वर्षी रोहित शर्मा, मनिता बतरा, विघ्नेश फोगाट, राणी रामपाल आणि मरियप्पन फंगवेल्लू यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. एकाच वर्षात पाच खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार मिळण्याचे हे पहिलेच वर्ष होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.