Khopoli Bus Accident :शॉर्टकट घेणे बेतले जिवावर

एमपीसी न्य़ूज –  जुना मुंबई-पुणे महामार्गावर शिंगरोबा मंदिराजवळ (Khopoli Bus Accident ) खासगी बस दरीत कोसळून  मोठा अपघात झाला. यावेळी चालकाने खोपोली येथे दोघांना ड्रॉप करण्यासाठी हा मार्ग निवडला होता. चालक ही नवखा असल्याने त्याला मार्गाचा अंदाज आला नाही त्यामुळे हा अपघात घडला. संबंधीत ढोल-ताशा पथक हे पिंपळे गुरव येथील सुदर्शन नगर येथे आंबेडकर जयंती निमीत्त मिरवणूकीत ढोल-ताशा वाजविण्यासाठी आले होते.

Maharashtra News : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

यामध्ये 6 वर्षाचा विर ते 29 वर्षाच्या तरुणाचा यात मृत्यू झाला आहे. तसेच ढोल ताशा पथकाचा प्रमुख सतिश श्रीधर धुमाळ (वय 25)  व त्याचा भाऊ स्वप्नील श्रीधर धुमाळ (वय 16), या दोन सख्या भावांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या घऱातील दोन्ही मुले या अपघातात हिरावले गेल्याने घरावर शोककळा पसरली आहे.

गोरेगाव येथील मयतांच्या मित्र परिवाराने एमपीसी न्यूजशी बोलताना सांगितले की, धुमाळ यांना हे पथक घेऊन जाऊ नका ,तसेच चालक नवखा आहे, असा विरोध करण्यात आला होता मात्र त्यांनी कार्यक्रम करायचाच म्हणून ठरवून गेले होते.

केवळ शॉर्टकट म्हणून अनोळखा व निर्जन मार्ग निवडणे पथकाला भयानक  जिवावर( Khopoli Bus Accident )बेतले आहे. या अपघातात मृतांची संख्या 14 वर गेली असून एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.