Kondhva Accident News : कोरोना लस घेण्यासाठी निघालेल्या तरुणीचा अपघाती मृत्यू

एमपीसीन्यूज : कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी निघालेल्या एका तरुणीचा एनआयबीएम रस्त्यावर झालेल्या विचित्र अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. अंगावरून कार गेल्यामुळे तिचा मृत्यू झाला.

गायत्री इथापे (वय 19, रा. वाई, जि. सातारा) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. गायत्री ही पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होती.

याप्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत तरुणीचा मित्र प्रथमेश मांढरे (वय 20) याने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, गायत्री आपल्या मित्रासोबत दुचाकीवरुन कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी जात होती. एनआयबीएम मार्गाने मुंढवा येथे जात असताना समोर अचानक रिक्षा आल्याने तिच्या मित्राने ब्रेक दाबला. यामुळे गायत्री दुचाकीवरून खाली पडली. याचवेळी पाठीमागून उंड्रीच्या दिशेने जात असलेली भरधाव कार तिच्या अंगावरून गेल्याने ती गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.