Pune crime : कोंढवा येथे हुक्का पार्लवर कारवाई, दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कोंढवा येथे लॅविटेट हॉटेल व द ब्रेक रुम हॉटेल या दोन्ही ठिकाणी बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या गुन्हे शाखेकडून (Pune crime) कारवाई करण्यात आली आहे.ही कारवाई 1 नोव्हेंबर रोजी केली आहे.

पोलिसांना याची खबर मिळताच मंगळवारी (दि.1) छापा टाकला.(Pune crime) यावेळी घटनास्थळावरून पोलिसांनी 65 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी दोघांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना कोंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Mahavitaran : प्रतिक्षा यादीतील 117 विद्युत सहाय्यक उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी आज होणार

ही कारवाई सामाजीक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विज कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, पोलीस अमंलदार राजेंद्र कुमावत, अजय राणे, प्रमोद मोहिते, (Pune crime) मनिषा पुकाळे, आण्णा माने, हणमंत कांबळे, अमित जमदाडे व पुष्णेंद्र चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.