Kondhwa : गरोदर असताना पत्नीला दिला तोंडी तलाक; पोलिसांत गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पत्नीला तोंडी तलाक देणाऱ्या पतीविरुद्ध (Kondhwa) कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी पीडितेच्या माहेरून 50 लाख रुपयांची मागणी करून छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी पती आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पती अब्जुर सलीम शेख, वहिनी बुशारा, सासू शेरबानो, हुमा, सासरा समीर शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी अब्जूरने दोन वर्षांपूर्वी एका तरुणीशी लग्न केले होते. व्यवसाय सुरू करण्यासाठी अब्जूरने तरुणीला तिच्या माहेरून 50 लाख रुपये आणण्यास सांगितले. तो तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करू लागला. तसेच पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य देखील केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.

पत्नीशी भांडण झाल्यानंतर अब्जूरने तीन वेळा तलाक म्हटले. तरुणी (Kondhwa) गरोदर असताना तिला तिच्या वडिलांच्या घरी पाठवण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक शेख या घटनेचा तपास करत आहेत.

Today’s Horoscope 25 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.