Lahor : कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याला पाकिस्तानात अटक

एमपीसी न्यूज- मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात उल दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याला पाकिस्तानात लाहोर येथे अटक करण्यात आली आहे. हाफिज सईद याच्या अटकेमुळे भारताच्या दहशतवादाच्या विरोधातील लढ्याला मोठे यश मिळाले आहे.

लाहोरहून गुजरानवाला येथे जात असताना हाफिजला बेड्या ठोकण्यात आल्या. अटकेनंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या अटकेविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे हाफिजने म्हटले आहे. पाकिस्तानातील दहशतवादाच्या विरोधात काम करणारी संस्था काउंटर टेररिझम डिपार्टमेन्टने कारवाई केली. या अटकेविरोधात न्यायालयात जाणार असल्याचं हाफिजनं म्हटलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.