PMPML : पीएमपीएमएलच्या पास केंद्रांवर कॅशलेस सुविधेला सुरुवात

एमपीसी न्यूज  : पीएमपीएमएल प्रशासनाने बसमधील (PMPML) तिकीटा बरोबरच आता पास केंद्रावर देखील कॅशलेस सुविधेला सुरुवात केली आहे. सोमवार (दि.23) पासुन महामंडळाच्या सर्व 40 पास केंद्रांवर प्रवासी नागरिकांना पाससाठी क्यू-आर कोडद्वारे पेमेंट करता येणार आहे.

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या शुभहस्ते व परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत कॅशलेस सुविधेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

याप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पीएमपीएमएलचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांच्यासह सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या क्षेत्रिय प्रमुख आशा कोटस्थाने, मुख्य प्रबंधक.अजय वाजपेयी, शाखा प्रमुख मनोजकुमार सिन्हा, पीएमपीएमएलचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) सतिश गव्हाणे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी नारायण करडे, वाहतूक नियोजन अधिकारी (आय.टी.) विजय रांजणे, प्र. मुख्य अभियंता निवृत्ती भांडे, पास विभाग प्रमुख विकास मते, खाजगी बस विभाग प्रमुख समीर आत्तार, अपघात विभाग प्रमुख अशोक साबळे, सेंट्रल वर्कशॉपचे प्र. वर्क्स मॅनेजर राजकुमार माने, पुणे स्टेशन डेपो मॅनेजर संजय कुसाळकर, न.ता.वाडी डेपो मॅनेजर संतोष किरवे उपस्थित होते.

PCMC : कचरा सेवा शुल्कातून महापालिका तिजोरीत 45 कोटी , स्थगिती आदेशाची प्रतीक्षा

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या सर्व पास केंद्रावरून विविध प्रकारच्या पासेसची विक्री केली जाते.परिवहन महामंडळास (PMPML) महिन्याला पास विक्रीतून सरासरी 5 कोटी रुपयाचे उत्पन्न प्राप्त होत असते. तर सरासरी 60 हजार पासची विक्री होत असते. कॅशलेस पेमेंट सुविधेमुळे पास विक्रीच्या ज्या जुन्या सुविधा चालू आहेत त्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे ही पीएमपीएमएलतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.