Loksabha Election 2024 : बेघर मतदार देखील बजावणार मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज – देशभरात लाखो लोक बेघर (Loksabha Election 2024) आहेत. त्यांना देखील लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होता येणार आहे. बेघर नागरिकांना मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने नवीन आणि सोपा पर्याय दिला आहे.

18 वर्ष पूर्ण असलेले बेघर नागरिक मतदार म्हणून नोंदणी करू शकतील. त्यासाठी त्यांना फॉर्म नंबर 6 भरावा लागेल. निवडणूक आयोगाकडून फॉर्म नंबर 6 द्वारे नवीन मतदारांची नोंदणी केली जाते. तसेच ज्यांनी आपला पत्ता बदलला आहे, त्यांना देखील हा फॉर्म भरून पत्ता दुरुस्त करून घेता येतो. त्यामुळे बेघर नागरिकांना देखील फॉर्म नंबर 6 भरावा लागेल.

निवडणूक आयोगाच्या www.eci.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन अथवा Voter Helpline Mobile App चा वापर करून हा फॉर्म नंबर 6 भरता येऊ शकतो. त्यामध्ये उमेदवारांना आपले नाव, वय, जन्मतारीख, जन्माचे ठिकाण, पत्ता, मोबाईल क्रमांक, मेल आयडी अशी माहिती द्यावी लागते.

यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड अपलोड करावे लागेल. आपला फोटो आणि पत्त्याचा पुरावा देखील द्यावा अलागेल. बेघर व्यक्ती ज्या ठिकाणचा पत्ता देतील तिथे बूथ स्थरावरील अधिकारी पाहणी करतात. त्यानंतर बेघर नागरिकांना पत्त्याचा पुरावा द्यावा (Loksabha Election 2024) लागणार नाही.

 

फॉर्म नंबर 6 जमा केल्यानंतर 30 दिवसात आपले मतदान कार्ड येईल. फॉर्म जमा केल्यानंतर मेलवर एक लिंक येते, त्यावर क्लिक करून मतदान कार्डची प्रक्रिया कुठवर आली आहे, हे आपल्याला तपासता येऊ शकते.

यावर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मतदारांची नोंदणी देखील शेवटच्या टप्प्या पर्यंत करण्यात येणार आहे. ज्यामुळे जास्तीत जास्त मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यास मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.