Loksabha Election : लोकसभेची निवडणूक 16 एप्रिलला? निवडणूक आयोगाचे नेमके काय आहे पत्र?

एमपीसी न्यूज – प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठपनेनंतर (Loksabha Election)लोकसभेची निवडणूक कधी जाहीर होणार याची चर्चा सुरू असताना निवडणूक आयोगाच्या एक पत्र समोर आले आहे.

16 एप्रिल 2024 या दिवशी देशात लोकसभेच्या निवडणूका घेतल्या जातील, असे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तारखेबद्दल चर्चांणा उधाण आले. परंतु, निवडणुक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून हा दावा फेटाळण्यात आला असून तयारीसाठी ही तात्पुरती तारीख देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Pune : पिरंगुट येथे महिलांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पत्रात म्हटले (Loksabha Election)आहे की, निवडणुकीची सुरुवातीची तारीख आणि अंतिम तारीख याचा आराखडा तयार करण्यासाठी 16 एप्रिल 2024 ही तारीख ठरवण्यात आली आहे.

16 एप्रिल हीच निवडणुकीची तारीख असल्याच्या चर्चांना उधाण आल्यानंतर सीईओंनी ट्वीट करत खुलासा केला आहे. ही तारीख फक्त संदर्भासाठी आहे.
जाहीर करण्यात आलेली तारीख ही निवडणूक आयोगला आराखडा आणि योजनेच्या तयारीसाठी संदर्भ म्हणून जाहीर करण्यात आली होती, असे पत्रात म्हटले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.