Lonavala: पावसाचा जोर झाला कमी, गुरुवारी शहरात 148 मिमी पाऊस

Lonavala: 148 mm rain in the city on Thursday संततधार पावसामुळे लोणावळा धरणातील पाणी पातळीत तसेच इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

एमपीसी न्यूज- लोणावळा शहरात गुरुवारी 24 तासांत 148 मिमी पाऊस झाला आहे. गुरुवारी (दि.6) दिवसभर शहरात जोरदार पाऊस झाला. रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. शहरात आजपर्यत एकूण 2096 मिमी पाऊस झाला आहे.

सोमवारी (दि.3) रात्री लोणावळ्यात पावसाला सुरूवात झाली होती. संततधार पावसामुळे लोणावळा धरणातील पाणी पातळीत तसेच इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

वाकसई चाळ, डोंगरगाव, कार्ला, मळवली भागातील उथळ व सखल भागात नदीपात्रातील पाणी पसरले आहे. कामशेत जवळ देखील नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये गेले आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.