Lonavala: लोणावळा शहर दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निखिल कविश्वर

एमपीसी न्यूज – लोणावळा शहरातील दैनिक वृत्तपत्रात काम करणार्‍या पत्रकारांनी दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर एकत्र येत लोणावळा शहर दैनिक पत्रकार संघाची स्थापना केली. दैनिक ‘संध्या’चे पत्रकार व नगरसेवक निखिल कविश्वर यांची यावेळी अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

दैनिक ‘सकाळ’चे ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब म्हाळसकर व ‘लोकमत’चे पत्रकार विशाल विकारी यांची उपाध्यक्षपदावर निवड करण्यात आली. ‘पुण्यनगरी’चे पत्रकार नितीन तिकोणे (सचिव), ‘लोकमंथन’चे पत्रकार प्रशांत पुराणिक (खजिनदार), ‘प्रभात’चे पत्रकार संजय हुलावळे (सहसचिव), ‘सामना’चे पत्रकार नरेश बोरकर (सह खजिनदार), ‘पुढारी’चे पत्रकार विशाल पाडाळे (पत्रकार परिषद प्रमुख), ‘महाराष्ट्र टाईम्स’चे पत्रकार बंडू येवले व ‘केसरी’चे पत्रकार दीपक तारे (प्रकल्प प्रमुख) यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली.

लोणावळा शहर हे पर्यटनस्थळ असल्याने या ठिकाणी विविध घटना घडामोडी घडत असतात तसेच द्रुतगती मार्ग व राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात, गुन्हे या सर्व दैनंदिन घडणार्‍या घडामोडींवर दैनिकांच्या पत्रकारांना बारकाईने लक्ष ठेवावे लागते. याकरिता सर्व दैनिक पत्रकारांचा एकमेकांत समन्वय राखण्याच्या उद्देशाने लोणावळा शहर दैनिक पत्रकार संघाची स्थापना केली आहे. संघाच्या माध्यमातून सर्वजण एकमेकाच्या संपर्कात राहण्यास मदत होणार असल्याचे निखिल कविश्वर यांनी सांगितले. लोणावळा शहरातील दैनंदिन काम करणार्‍या इतर पत्रकारांना देखील या संघात सामावून घेण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.