Lonavala : लोणावळ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या फोटोला फासले काळे

In Lonavala, NCP activists snapped a photo of Padalkar

एमपीसीन्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टिका करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा लोणावळ्यात निषेध नोंदविण्यात आला. यावेळी पडळकर यांचा फोटोला कार्यकर्त्यांनी काळे फासले.

यावेळी राष्ट्रवादीचे लोणावळा शहराध्यक्ष जीवन गायकवाड, ज्येष्ठ नेते रमेशचंद्र नय्यर, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर, प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे, जिल्हा उपाध्यक्ष राजु बोराटी, दत्ता गोसावी, सनी पाळेकर, अजिंक्य कुटे, श्वेता वर्तक, रमेश भांगरे, सलीम मण्यार, सोमनाथ गायकवाड आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

रमेशचंद्र नय्यर यांच्या बंगल्याच्या आवारात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर लोणावळा पोलीस ठाण्यात कारवाई करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like