Lonavala News : गुटखा बनविणार्‍या कारखान्यावर छापा टाकत पोलिसांनी 2 कोटीचा साठा केला जप्त

0

एमपीसी न्यूज – लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आज मावळ तालुक्यातील फांगणे गावात एका गुटखा बनविणार्‍या कारखान्यावर छापा टाकत सुमारे 2 कोटी 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असलेल्या फांगणे गावात एका शेड मध्ये बेकायदेशीरपणे गुटखा बनवत असल्याची गुप्त माहिती लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांना मिळाली होती.

_MPC_DIR_MPU_II

या माहितीच्या आधारे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी IPS नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुजावर यांच्या टिमने फांगणे येथील कारखान्यावर छापा टाकला.

या ठिकाणी गुटखा बनविण्यासाठी लागणारे वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या प्रकारचे व रंगाचे केमिकल भरलेले मोठे मोठे कॅन, त्याचप्रमाणे गुटखा तयार करण्यासाठी लागणारे ॲल्युमिनियमची मोठी भांडी, गुटखा तयार करण्यासाठी लागणारे इलेक्ट्रॉनिक मिक्सिंग मशीन त्याचप्रमाणे गुटका तयार करण्यासाठी लागणारे वेगवेगळे औषधी द्रव्य असा एकूण सुमारे 2 कोटी 5 लाख रुपयांचा मुद्देमाल लोणावळा ग्रामीण पोलिसांनी जप्त केलेला असून सदर ठिकाणाहून ताब्यात घेतलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment