Lonavala News: कातळधार धबधब्याजवळ वाट चुकलेल्या दोन पर्यटकांना शिवदुर्गने काढले शोधून

एमपीसी न्यूज – कातळधार धबधबा परिसरात वाट चुकल्याने भरकटलेल्या दोन पर्यटकांना शिवदुर्गच्या रेस्कू पथकाने चार तासाच्या अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढले. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.

अनिकेत नेमाणे व प्रज्वल पवार (रा. तळवडे पुणे) हे दोन तरुण लोणावळा खंडाळा भागातील कातळधार धबधबा येथे दुपारी गेले होते. पण परत येताना वाट चुकल्याने ते दरीतील झाडाझुडपांमध्ये भरकटले. याची माहिती लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांना मिळाल्यानंतर त्यांनी शिवदुर्ग मित्र या लोणावळ्यात रेस्कू पथकाला सदर घटनेची माहिती देत मदतीसाठी पाचारण केले.

शिवदुर्गची एक टीम आज तळेगावात एका रेस्कू करिता गेलेली असताना रेस्कूची दुसरी टिम शिवदुर्गचे रोहीत वर्तक यांच्या नेतृत्वाखाली शोध मोहीमेसाठी निघाली रितेश कुडतरकर, हर्ष तोंडे, दिपाली पडवळ, काटकर , मोहीत काटकर यांनी वाट चुकलेल्या पर्यटकांशी संपर्क केला ते कड्याच्या टोकाला आले होते मात्र त्यांना रस्ता सापडत नव्हता, टिमने त्यांच्या दिशेने कुच केली, त्यांचा शोध घेतला व त्यांना सुखरूप रस्त्यावर आणून सोडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.