Pimpri News: पॉझिटिव्ह न्यूज! शहरात कोरोना रुग्ण दुपटीचा वेग 70 दिवसांवर

आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांमध्ये दुपटीने वाढ होण्याचे दिवस वाढत चालले आहेत. रुग्ण दुपटीचा कालावधी 38 दिवसांवर खाली आला होता. आता 38 दिवसांवरून 70 दिवसांवर गेला आहे. आता 70 दिवसांनी रुग्णांची संख्या दुप्पट होत असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. सध्या दिवसाला चार ते साडेचार हजार चाचण्या केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मार्च, एप्रिल, मे च्या मध्यापर्यंत रुग्णसंख्या नियंत्रणात होती. मे अखेर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ झाली. ऑगस्टमध्ये देखील रुग्णवाढीचे प्रमाण कायम राहिले. सप्टेंबरच्या पहिले पंधरा दिवसांत झपाट्याने वाढ होताना दिसून आली.

_MPC_DIR_MPU_II

शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या 75 हजाराच्या उंबरठ्यावर आहे. शहरात सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. शहरात कालपर्यंत 74 हजार 116 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 60 हजार 764 जणांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे. सध्या  तर, 13 हजार 352 सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.  शहरातील 1229 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 438 अशा 1667 जणांचा कालपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शहरातील कोरोनाचे रुग्ण दुपटीचा कालावधी 38 दिवसांवर खाली आला होता. आता 38 दिवसांवरून 70 दिवसांवर गेला आहे. जुलै महिन्यात 11 दिवसांनी रुग्ण दुप्पट होत होते. ऑगस्टमध्ये वाढत वाढत 15 ते 20 दिवसांपर्यंत गेला होता. सप्टेंबरच्या सुरुवातीला 40 दिवसांवर गेला होता. पुन्हा तो 38 दिवसांवर झाला होता. आता सप्टेंबर अखेरला तो 70 दिवसांवर गेला आहे. आजपासून पुढील 70 दिवसांनी रुग्ण दुप्पट होतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.