BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : श्रीरंग बारणे यांना लोणावळा शहरातून मोठी आघाडी देणार – सुरेखा जाधव

एमपीसी न्यूज- पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या लोणावळा शहरातून शिवसेना, भाजपा, रिपाई महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मतांची मोठी आघाडी मिळवून देणार असल्याचे नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सांगितले.
महायुतीच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी लोणावळा शहरात प्रचारात च‍ांगलीच आघाडी घेतली आहे. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, भाजपाचे शहराध्यक्ष व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, शिक्षण मंडळाचे माजी सभापती बाळासाहेब फाटक, शिवसेनेचे पुणे जिल्हा महिला संघटक व गटनेत्या शादान चौधरी, शहरप्रमुख सुनील इंगूळकर, रिपाई (अ) पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शहराध्यक्ष कमलशिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहरात प्रभागवार प्रचार सुरु करण्यात आला आहे.
  • भांगरवाडी बाजारपेठ, वलवण, नांगरगाव, तुंगार्ली, इंदिर‍नगर या प्रभागामध्ये बारणे यांचा प्रच‍ार करण्यात आला आहे. दरदिवशी प्रचारात नागरिकांचा वाढता सहभाग हा बारणे यांचे मताधिक्य व‍ाढविण्याचे द्योतक असल्याचे श्रीधर पुजारी, शादान चौधरी व सुनील इंगूळकर यांनी सांगितले. शिवसेना भाजपा व रिपाईचे पदाधिकारी व कार्यकर्ते सर्व वाद बाजुला ठेवत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याकरिता एकवटले आहेत. ‘खिच के तान धनुष्यबाण’, ‘मोदी है तो मुम्किंन है’ च्या घोषणा देत घरोघरी प्रचारपत्रके पोहचविण्याचे काम युवा पदाधिकारी व कार्यकर्ते करत होते.
प्रचारात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. आज तुंगार्ली इंदिरानगर प्रभागात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत नगरसेवक बाळासाहेब जाधव, ब्रिंदा गणात्रा, गौरी मावकर, शिवदास पिल्ले, गणेश म‍ावकर, जयश्री आहेर, सिंधु परदेशी, कल्पना आखाडे, भाजपा महिलाध्यक्षा योगिता कोकरे, सुरेश पाडाळे, शिवसेना उप शहर प्रमुख मनीषा भांगरे, मनीष पवार, अरुण लाड, महेश खराडे, प्रकाश हजारे, सुनील तावरे, समीर इंगळे, प्रकाश काळे, अनिल खिल्लारे, दिनेश ओसवाल, संजय भोईर, हर्षल होगले, युवामोर्चा कार्याध्यक्ष धवल चौहान, राजु परदेशी, प्रवीण काळे, नवीन भुरट, सरपंच बबन खरात, प्रदीप थत्ते, कमलेश सैंगर, आशिष बुटाला, आकाश म‍ावकर, विजय आखाडे, संतोष गुप्ता, ललित सिसोदिया, गिरीश मुथ्था यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3