Lonavala : ठाकरे गटाचा लोणावळा येथे मेळावा संपन्न

एमपीसी न्यूज – शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा मेळावा लोणावळा येथे मंगळवारी (दि. 16) संपन्न (Lonavala) झाला. यावेळी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी आणि कार्यकर्त्यांचे संघटन या विषयावर मेळाव्यात चर्चा झाली.

शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर, शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर, माजी आमदार, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, मावळ तालुका शिवसेना संपर्क प्रमुख प्रभाकर पवार, मावळ व पिंपरी -चिंचवड महिला आघाडी संपर्क संघटिका लतिका पाष्टे, संजोग वाघेरे, मावळ तालुक्यातील पदाधिकारी महिला आघाडी व लोणावळा शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका शिवसैनिक उपस्थित होते.

Pimpri : गुगल टॉप सर्च ट्रेंडीगमध्ये पवनाथडी जत्रा!

संजोग वाघेरे यांची शिवसेना मावळ लोकसभा संघटक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शिवसेना मावळ तालुका व लोणावळा शहराच्या वतीने सत्कार करण्यात आला.

मेळाव्यात बोलताना रवींद्र मिर्लेकर म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या कामाचा ठसा (Lonavala) घराघरात उमटलेला आहे. आजही महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबत आहे. पण लोकांपर्यंत पोहोचणारा कार्यकर्ता आपल्याला तयार केला पाहिजे.

संजोग वाघेरे म्हणाले, “इथे काम करायला चांगला वाव आहे असे समजल्यानंतर मी शिवसेनेत प्रवेश केला. ज्या पक्षासाठी मी अहोरात्र काम केले, त्यापेक्षा जास्त काम शिवसेनेसाठी करेन. पक्षाने जी जबाबदारी दिली, ती पूर्ण पाडीन. उद्धव ठाकरे यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला आहे, त्याला मी कधीच तडा जाऊ देऊणार नाही. शिवसैनिकासाठी मी 24X7 उपलब्ध आहे. ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली, त्यांच्याबद्दल बोलायला मागेपुढे पाहणार (Lonavala)  नाही.”

https://www.youtube.com/watch?v=PgIBWVfvvUw&t=123s

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.