Pimpri : गुगल टॉप सर्च ट्रेंडीगमध्ये पवनाथडी जत्रा!

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या वतीने महिला बचत गटांनी उत्पादित ( Pimpri) केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी आयोजित केलेल्या पवनाथडी जत्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दिवसाला एक लाखाहून अधिक लोकांनी जत्रेला भेट दिली. तीन कोटी रुपयांची उलाढाल झाली असून  गुगल टॉप सर्च ट्रेंडीगमध्येही पवनाथडी जत्रा होती.

Alandi : शिवस्मारकाजवळील मोकळ्या जागेत नव्याने अतिक्रमणाची भर

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सांगवी येथील पी.डब्लू.डी मैदानावर पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले होते.  11 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीत जत्रा झाली. यंदा पाच दिवस जत्रेचे आयोजन केले होते. पवनाथडी जत्रेत महिला बचत गटांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्टॉल्समध्ये विविध बचत गटातील महिलांनी आपल्या उत्कृष्ट पाककलेचे सादरीकरण केले.

मांसाहारी खवय्यांसाठी मासे, मटन, चिकन, विविध प्रकारच्या बिर्याणी अशा विविध प्रकारच्या पदार्थांची मेजवानी पाहायला मिळाली. तर शाकाहारी खवय्यांसाठी दक्षिण भारतीय खाद्य पदार्थ, पुरण मांडा, पुरणपोळी, छोले मटार करंजी, खोबर करंजी, उकडीचे व विविध प्रकारचे मोदक छोले भटुरे, महाराष्ट्रीयन झुणका भाकरी, थालीपिठ, गुजराती ढोकळा, फाफडा, दिल्ली चाट, मेथी धपाटे अशा रुचकर भोजनावर ताव मारण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत होते.

यंदा पाच दिवसांची जत्रा भरविली होती. दिवसाला एक लाखाहून अधिक लोक जत्रेला भेट देत होते. सांस्कृतिक कार्यक्रमालाही लोकांची गर्दी होती. जत्रेत तीन कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे उपआयुक्त अजय चारठाणकर यांनी ( Pimpri) सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=PgIBWVfvvUw&t=123s

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.