Pimpri News: घर बसल्या ‘या’ लिंकवर पहा पंतप्रधान आवास योजनेची सोडत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत च-होली, रावेत आणि बो-हाडेवाडी येथे आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी बांधण्यात येणा-या सदनिकांसाठी आज (शनिवारी) सकाळी 11 वाजता सोडत काढली जाणार आहे.

लाभार्थ्यांना घर बसल्या (Link – www.facebook.com/pcmcindia.gov.in) Live व YouTube (Link – www.youtube.com/PCMCINDIA ) या लिंकवर ही सोडत बघता येणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोडतीच्या ठिकाणी येण्याची आवश्यकता भासणार नाही.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी 11  वाजता केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सोडत काढली जाणार आहे.  या योजनेची सोडत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फेसबुक पेजवर लाईव्ह दाखविली जाणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

तसेच युट्युबद्वारे लाईव्ह दाखविली जाणार आहे. www.facebook.com/pcmcindia.gov.in या लिंकवर नागरिक घर बसल्या सोडत पाहू शकणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी सोडतीच्या ठिकाणी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीकोनातून गर्दी करु नये असे आवाहन महापालिकेने केले आहे.

47 हजार 801 अर्ज ठरलेत पात्र

दरम्यान, च-होली, रावेत आणि बो-हाडेवस्ती येथे आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी घरे बांधण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी महापालिकेने अर्ज मागविले होते. एकूण 47 हजार 878 अर्ज आले होते. त्यापैकी 47 हजार 801 अर्ज पात्र ठरले आहेत. च-होतील 1442 सदनिका, रावेतमध्ये 934 आणि बो-हाडेवाडीत 1288 अशा एकूण 3664 सदनिका असणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.