Pune : मोग-याच्या हजारो फुलांचा महालक्ष्मीला पुष्पाभिषेक

अक्षयतृतीये निमित्त सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात पुष्पसजावट पाहण्याची संधी

एमपीसी न्यूज – मोग-याच्या फुलांनी सजलेला महालक्ष्मी देवीचा गाभारा… सुवासिक फुलांचा देवीला घातलेला पोशाख… विविधरंगी पुष्पांचे दागिने आणि संपूर्ण मंदिरात केलेली फुलांची मनोहारी आरास श्री महालक्ष्मी मंदिरात करण्यात आली. अक्षयतृतीयेच्या निमित्ताने केलेली पुष्पसजावट पाहण्याकरीता देवीभक्तांनी मोठया संख्येने गर्दी केली होती.

श्री महालक्ष्मी मंदिर, बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने अक्षयतृतीयेच्या निमित्ताने वासंतिक मोगरा महोत्सवाचे आयोजन मंदिरामध्ये करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते.

मोग-याच्या फुलांनी मंदिराचा परिसर खुलून गेला होता. तब्बल १२१ किलो मोगरा, २०० ते २५० गुलाबाच्या फुलांच्या गड्डया, लिली, चाफा, जाई-जुई, गुलछडी, झेंडू यांसह अनेक फुलांची आरास करण्यात आली. फुलांची आरास पाहण्याकरीता आणि सायं आरतीकरीता पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.