Mahalunge : कंपनीतील साहित्य चोरल्या प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – कंपनीतील साहित्य चोरल्या प्रकरणी (Mahalunge) दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 21) पहाटे पाच वाजता व्हिजन केबल्स प्रा ली या कंपनीत खालुम्ब्रे येथे घडली.

शिवकुमार उत्तमराव जवळकर (वय 26), मुस्तफा बाबूमिया पिंजारी (वय 25, दोघे रा. चाकण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शशी मोहन शर्मा (वय 40, रा. मोशी) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Nigdi : भारतातील शेती उद्योग जागतिक पातळीवर प्रथम क्रमांकावर पोहचू – हर्षवर्धन पाटील

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शर्मा काम करत असलेल्या व्हिजन केबल्स या (Mahalunge) कंपनीतून आरोपींनी 49 हजार 736 रुपये किमतीचा माल चोरून नेला. आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.