Maharashtra Corona Update: राज्याचा रिकव्हरी रेट 97.06 टक्के, आज 7,142 रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (बुधवारी) दिवसभरात 7,142 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 20,222 कोरोनामुक्त झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, राज्याचा रिकव्हरी रेट 97.06 टक्के एवढा झाला आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 78 लाख 23 हजार 385 एवढी झाली आहे. त्यापैकी 75 लाख 93 हजार 291 जण बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात 82 हजार 893 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज दिवसभरात 92 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 43 हजार 247 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.83 टक्के एवढा आहे. राज्यात आजवर 7 कोटी 59 लाख 05 हजार 676 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या महाराष्ट्रात 2,396 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 5,78,076 जण होम क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.