Maharashtra Corona Update : आज शून्य मृत्यू, 225 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज दिवसभरात 225 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, आज शुन्य मृत्यू झाले आहेत. दिवसभरात 461 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारी नुसार, आजवर 78 लाख 69 हजार 038 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 77 लाख 17 हजार 823 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 98.08 टक्के आहे. राज्यात सध्याच्या घडीला 3,472 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

राज्यात आजवर 1 लाख 43 हजार 740 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले असून 1.82 टक्के एवढा मृत्यूदर आहे. सध्या राज्यात 28,975 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 589 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 83 लाख 14 हजार 109 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.