Maharashtra Corona Update : राज्यात आज ‌893 नवे कोरोना रुग्ण, 1,040 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (बुधवारी) दिवसभरात राज्यात 893 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 1,040 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्येचा आलेख उतरणीला लागला असून, सध्या राज्यात 6 हजार 286 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

 

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 66 लाख 40 हजार 888 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 89 हजार 720 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.72 टक्के एवढा आहे.

 

राज्यात आज 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजवर 1 लाख 41 हजार 204 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. सध्या 74 हजार 170 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 891 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 63 लाख 88 हजार 902 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.