Rohit Sharma : T20 नंतर एकदिवसीय संघाचे कर्णधारपद देखील रोहित शर्माकडे

एमपीसी न्यूज – भारतीय T20 क्रिकेट संघाची जबाबदारी हिटमॅन रोहित शर्मा याच्याकडे सोपविण्यात आली होती, त्यानंतर आता एकदिवसीय संघाचे कर्णधारपद देखील रोहित कडे देण्यात आले आहे. भारतीय संघाच्या निवड समितीने याबाबतची घोषणा केली आहे.

 

यूएईमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहलीनं टी-20 चं कर्णधारपद सोडलं होतं. त्याच्या जागी रोहित शर्माची निवड करण्यात आली होती. त्यानंतर आता एकदिवसीय संघाचं कर्णधारपदही रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या मते, टी-20 आणि एकदिवसीय संघाचा एकच कर्णधार असावा. त्यामुळे रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक होणार आहे, त्याच्या तयारीसाठीही रोहितला वेळ मिळेल.

 

 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के. एल राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेट किपर), वृद्धीमान साहा (विकेट किपर), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शामी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.