Maharashtra Corona Update : राज्यात ओमायक्रॉनचे 10 रुग्ण, ॲक्टिव्ह रुग्णसंख्या सात हजारांहून कमी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या दहा झाली आहे. त्यापैकी पुण्यात 1 पिंपरी चिंचवड 6 आणि मुंबईत 3 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. आज (सोमवारी) दिवसभरात राज्यात 518 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 811 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या सात हजारांहून कमी झाली आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 66 लाख 39 हजार 296 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 87 हजार 593 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.71 टक्के एवढा आहे.


 

राज्यात सध्या 6 हजार 853 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 5 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजवर 1 लाख 41 हजार 175 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.

 

सध्या राज्यात 78 हजार 801 रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 893 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 61 लाख 56 हजार 544 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.