Maharashtra Corona Update: राज्यात दिवसभरात 11,111 नवे रुग्ण 8,837 जणांना डिस्चार्ज

Maharashtra Corona Update: 11,111 new patients, discharged 8,837 in a day in the state राज्यात आज 288 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून राज्यातील एकूण मृतांची संख्या 20 हजार 037 इतकी झाली आहे.

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात तब्बल 11 हजार 111 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून जवळपास 288 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आज दिवसभरात 8 हजार 837 जण कोरोनामुक्त झाले असून आजवर 4 लाख 17 हजार 123 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यातील आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 5 लाख 95 हजार 865 एवढी झाली आहे. त्यापैकी सध्या 1 लाख 58 हजार 395 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आजवर राज्यातील 4 लाख 1 हजार 123 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आज 288 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून राज्यातील एकूण मृतांची संख्या 20 हजार 037 इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून राज्याचा रिकव्हरी रेट 70 टक्के एवढा झाला आहे तर, राज्यातील मृत्यूची टक्केवारी 3.36 इतकी आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 31 लाख 62 हजार 740 नमुन्यांपैकी 5 लाख 95 हजार 865 नमुने पॉझिटिव्ह (18.84 टक्के) आले आहेत. राज्यात 10 लाख 53 हजार 897 लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या 38 हजार 203 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

मुंबईत आज 1010 नवे रुग्ण आढळले असून 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आज दिवसभरात 719 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत आजवर 1 लाख 03 हजार 468 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत सध्या 17 हजार 828 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत जगात भारताचा तिसरा तर भारतात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.