Maharashtra Corona Update : राज्यात आज 1,927 नवे कोरोना रुग्ण, 30 मृत्यू

एमपीसी न्यूज – राज्यात आज 1 हजार 927 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली तर 30 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 लाख 30 हजार 274 एवढी झाली आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात 4 हजार 011 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 19 लाख 36 हजार 305 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्याच्या घडीला 41 हजार 586 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 30 रुग्ण दगावले असून आतापर्यंत राज्यात 51 हजार 139 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.52 टक्के एवढा आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.26 टक्के झाले आहे. राज्यातील पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगर व नागपूर या जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत.

आजवर करण्यात आलेल्या 1 कोटी 47 लाख 06 हजार 992 नमूने तपासण्यात आले असून त्यापैकी 20 लाख 30 हजार 274 नमूने सकारात्मक आले आहेत.

सध्या राज्यात 1 लाख 89 हजार 288 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 121 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.