Maharashtra Corona Update : राज्यात आज 22,543 नवे रुग्ण, 416 मृत्यू 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज 22 हजार 543 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर, 416 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 11,549 बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

राज्य आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 10 लाख 60 हजार 308 झाली आहे. त्यापैकी 7 लाख 40 हजार 061 रुग्ण बरे झाले आहेत तर, सध्या राज्यात 2 लाख 90 हजार 344 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात 11,549 बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 69.8 टक्के एवढा झाला आहे.

आज 416 रुग्ण दगावले आहेत. राज्याचा मृत्यूदर 2.79 टक्के एवढा आहे. राज्यात आजवर केलेल्या 52 लाख 53 हजार 676 नमूणे तपासण्यात आले आहेत त्यापैकी 10 लाख 60 हजार 308 (20.18%) नमूणे सकारात्मक आले आहेत. राज्यात 16 लाख 83 हजार 770 जण होम क्वारंटाइन आहेत तर, 37 हजार 294 लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असून अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, सोशल डिस्टंसिंग यांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यात विविध अस्थपना सुरू केल्या आहेत मात्र, लोकांनी काळजी न बाळगल्यास रुग्ण संख्या अधिक वाढण्याचा धोका नाकारता येत नाही. तसेच पुन्हा लाॅक डाऊन करण्याची गरज भासू नये याची दक्षता घ्यावी असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.