Maharashtra Corona Update : आज 5 हजारांहून कमी कोरोना रुग्ण, ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 70 हजारांच्या खाली  

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (सोमवारी) पाच हजारांहून कमी नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

आज दिवसभरात 4 हजार 505 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर, 7 हजार 568 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्रात सध्या 68 हजार 375 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 63 लाख 57 हजार 833 एवढी झाली आहे. त्यापैकी 61 लाख 51 हजार 956 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 96.76 टक्के एवढा झाला आहे.

 

महाराष्ट्रात आज 68 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 34 हजार 64 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.10 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आतापर्यंत 4 कोटी 97 लाख 25 हजार 694 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 21 हजार 683 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 895 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.