Maharashtra Corona Update : राज्यात आज कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या दुप्पट; रिकव्हरी रेट 83.49टक्के

एमपीसीन्यूज : देशभरासह राज्यातील कोरोनाबाधितांची संख्येतही घट होत आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनानामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. आज, सोमवारी राज्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट आहे. तर, 165  रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. राज्यात आज 7 हजार 89  नवे कोरोनाबाधित आढळले असून, 15  हजार 656 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 83.49 टक्क्यांवर पोहचला आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 15  लाख 35 हजार 315 वर पोहचली आहे. यामध्ये 2 लाख 12  हजार 439  ॲक्टिव केसेस, कोरोनामुक्त झालेले 12  लाख 81  हजार 896 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 40 हजार 514  जणांच्या संख्येचा समावेश आहे.

सद्यस्थितीस 23  लाख 23  हजार 791  जण गृहविलगीकरणात आहेत. तर, 25 हजार 951 संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आजपर्यंत तपासल्या गेलेल्या 76  लाख 97 हजार 906 नमून्यांपैकी 15 लाख 35  हजार 315  नमूने(19.94 टक्के) करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.